राजापूर : जांभवली येथून तरुण बेपत्ता

राजापूर : राजापूर तालुक्यातील जांभवली नारकरवाडी येथील ग्रामस्थ योगेश प्रकाश तळेकर (वय ३०) हे १२ जुलै रोजी कोणालाही काहीही न सांगता घरातून सायंकाळी ५ वा. सुमारास निघून गेलेले आहेत. राजापूर पोलिस स्थानकांत याची खबर योगेश तळेकर यांच्या पत्नी योगिनी प्रकाश तळेकर यांनी दिली आहे.

तळेकर हे घरातून निघून गेल्यावर त्यांचा सर्व नातेवाईक व पररिसरातील गावांमधून शोध घेण्यात आला. मात्र, सापडून आले नाहीत. सफेद रंगाचा टी शर्ट व काळी पैंट परिधान केलेली आहे. याबाबत आर. एच. मुजावर करीत असून कुठे सापडल्यास त्वरित राजापूर पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन राजापूर पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:16 23-07-2025