सावर्डे येथील सह्याद्री पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या ऋतुज माळीची जर्मनीतील कंपनीत निवड

चिपळूण : सावर्डे येथील सह्याद्री पॉलिटेक्निक महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील गुणवंत विद्यार्थी ऋतुज माळी याची निवड जर्मनीमधील नामांकित कंपनीत झाली आहे. ही निवड महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व रोजगार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या इंडो-जर्मन करार कार्यक्रमांतर्गत झाली आहे.

राज्याचे कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन मंत्री मा. मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ऋतूजला औपचारिकरित्या ऑफर लेटर प्रदान करण्यात आले. या गौरवप्रसंगी राज्यस्तरावरून तसेच स्थानिक पातळीवरून ऋतूजच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाविद्यालयाचे मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. दिनेश खानविलकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. मंगेश भोसले तसेच चेअरमन महादेव जम्मा यांनी ऋतूजचे विशेष कौतुक केले आहे. सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. आमदार शेखर निकम यांनी ऋतूजला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून, त्याच्या यशामुळे संपूर्ण संस्थेचे नाव उज्वल झाले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:42 PM 23/Jul/2025