रत्नागिरी : शहर आणि जिल्ह्यात संर्पदंशाचे प्रमाण वाढले असून, पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण सर्वाधिक आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत तब्बल ५७५ जणांना सर्पदंशच्या घटना घडल्या आहेत तर एका व्यक्तीचा संर्पदंशाने मृत्यू झाला आहे तर ६२९ जणांना विंचूने चावा घेतला आहे. याचबरोबर माकड, मांजर, कुत्रा यासह इतर प्राण्यांनी हजारो जणांना चावा घेतल्याच्या घटना वाढलेल्या आहेत.
रत्नागिरी शहरासह विविध तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे सगळीकडे पाणीच असल्यामुळे पावसाळ्यात साप, विंचू बाहेर निघून घरात व परिसरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेची आहे.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात साप, विंचू मानवी वस्तीकडे वळतात. विशेषता सरपटणार्या प्राण्यांकडून चावा घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. शेतकरी शेतात कामे करताना, घरात, परिसरात सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५७५ व्यक्तींना सर्पदंश झाला असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण, उपजिल्हा सिव्हिल रुग्णालयात याची नोंद झाली असून या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. मृत्यूचा आकडा जास्त असून काही ठिकाणी नोंद नसल्याचे दिसून आले तर आतापर्यंत ६२९ जणांना विंचूने चावा घेतला आहे.
माकड चावण्याचे प्रमाण वाढतेय
पावसाळ्यात पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात येत असतात. काही ठिकाणी माकड हे पर्यटकावर हल्ला करत असतात तर काहींना गंभीर इजा करतात. राज्यातील इतर जिल्ह्यात ही माकडाने हल्ला करण्याचे प्रमाण वाढत आहे.
या ठिकाणी होतोय इलाज
उन्हाळ्यासह पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात साप, विंचू, कुत्रा चावल्याच्या घटना वाढतात. अशा रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालय, सिव्हिल, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे चावा घेण्यात आलेल्या नागरिकांवर योग्य ते उपचार करून त्यांना वाचविण्यात यश आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 26/Jul/2025














