रत्नागिरी, २३ जुलै २०२५ : गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठित गोवा ओपन पेअर्स ब्रिज फेस्टिव्हल स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याच्या सचिन जोशी आणि चिंतामणी दामले या ब्रिज जोडीने सिल्व्हर ग्रुपमध्ये द्वितीय क्रमांक पटकावत जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे.
या वर्षी रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशन आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. याच सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर जोशी-दामले जोडीने मिळवलेले हे यश विशेष महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन दामले यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, सर्व ब्रिज प्रेमींनीही या जोडीचे कौतुक केले आहे. या यशाने रत्नागिरीच्या ब्रिज खेळाला नवी ओळख मिळाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:15 23-07-2025












