रत्नागिरी : उदय सामंत प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरी शहर आणि तालुक्यातील विवाहित महिलांसाठी “स्मार्ट श्रावण सखी २०२५” या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सौंदर्य आणि बुद्धीचातुर्याचा सुरेख संगम असलेली ही स्पर्धा महिलांना त्यांचे विविध पैलू सादर करण्याची संधी देईल. स्पर्धेचा महाअंतिम सोहळा रविवार, १० ऑगस्ट २०२५ रोजी पार पडणार आहे.
स्पर्धेची प्राथमिक फेरी आणि स्वरूप
स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार, २ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्रवीर सावरकर नाट्यगृह येथे सायंकाळी ४ ते ८ या वेळेत होणार आहे. या फेरीत सहभागी महिलांना पारंपरिक पेहरावात स्वतःची ओळख करून द्यावी लागेल, ज्यात त्यांचे पूर्ण नाव, कौटुंबिक माहिती, आवडीनिवडी आणि स्पर्धेतील सहभागाचा उद्देश सांगावा लागेल. यानंतर, परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तरे देऊन स्पर्धकांना आपले बुद्धीचातुर्य सिद्ध करावे लागेल. प्राथमिक फे्रीमधून २० स्मार्ट महिलांची निवड महाअंतिम फेरीसाठी केली जाईल.
निवड झालेल्या स्पर्धकांसाठी विशेष प्रशिक्षण
प्राथमिक फेरीत निवड झालेल्या २० स्पर्धकांसाठी ६, ७ आणि ८ ऑगस्ट २०२५ रोजी विशेष कौशल्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसांत स्पर्धकांना रंगमंचावरील वावर, नृत्य कला, संभाषण कौशल्ये, आत्मविश्वास वाढवण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन, योगा, मेडिटेशन आणि व्यक्तिमत्त्व विकास सत्रांचे प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण स्पर्धकांना महाअंतिम सोहळ्यासाठी तयार करेल.
महाअंतिम फेरी आणि आकर्षक बक्षिसे
रविवार, १० ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या महाअंतिम फेरीत स्पर्धकांना स्वतःची ओळख करून देण्याबरोबरच, रंगमंचावरील आत्मविश्वासपूर्वक सादरीकरण (Catwalk Round) आणि त्यांच्यातील कौशल्याचे सादरीकरण करावे लागेल. तसेच, परीक्षकांच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देणे महत्त्वाचे ठरेल.
नियम व अटी: ही स्पर्धा केवळ रत्नागिरी शहर व तालुक्यातील विवाहित महिलांसाठी आहे. सौंदर्य, बुद्धीचातुर्य आणि कला यांना समान महत्त्व दिले जाईल. महाअंतिम फेरीपूर्वीचे सराव शिबिर सर्व स्पर्धकांसाठी अनिवार्य आहे.
विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातील:
- स्मार्ट श्रावण सखी २०२५ विजेती: रोख रु. १०,०००/-, मुकुट, बेल्ट, साडी आणि चषक.
- पहिली उपविजेती (1st Runner Up): रोख रु. ७,०००/-, बेल्ट, साडी आणि चषक.
- दुसरी उपविजेती (2nd Runner Up): रोख रु. ५,०००/-, बेल्ट, साडी आणि चषक.
याशिवाय, उत्तम व्यक्तिमत्त्व, उत्कृष्ट पेहराव, मोहक हास्य आणि उत्तम ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व यासाठी प्रत्येकी रोख रु. २,०००/-, बेल्ट, साडी आणि चषक अशी विशेष बक्षिसेही दिली जातील.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी सौ. शिल्पा सुर्वे (८९७५८३८१८१), सौ. स्मितल पावसकर (९४२१२३०१७७) किंवा सौ. कांचन नागवेकर (९४०५७४१३८१) यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेतील फेऱ्या व नियम बदलण्याचे सर्व अधिकार आयोजक व परीक्षकांकडे राहतील.













