लांजा : लांजा-राजापूर मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार तथा अंदाज समितीचे सदस्य किरण उर्फ भैय्या सामंत हे गुरुवार, २४ जुलै, २०२५ रोजी “आमदार आपल्या दारी” या विशेष दौऱ्यानिमित्त लांजा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींना भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते थेट ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
कार्यक्रमाचे तपशील खालीलप्रमाणे:
- सकाळी १०:०० वा. आंजणारी ग्रामपंचायत येथे ग्रामस्थांशी संवाद साधतील. (स्थळ: ग्रामपंचायत कार्यालय, आंजणारी, ता. लांजा)
- सकाळी ११:३० वा. वेरळ ग्रामपंचायत येथे भेट देतील. (स्थळ: जि.प. शाळा, वेरळ, ता. लांजा)
- दुपारी १२:३० वा. कणगवली ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहतील. (स्थळ: ग्रामपंचायत कार्यालय, कणगवली, ता. लांजा)
- दुपारी १:३० वा. तळवडे ग्रामपंचायत कार्यालयात भेट देतील. (स्थळ: ग्रामपंचायत कार्यालय, तळवडे, ता. लांजा)
- दुपारी ३:३० वा. कुरचुंब ग्रामपंचायत येथे उपस्थित राहतील. (स्थळ: ग्रामपंचायत कार्यालय, कुरचुंब, ता. लांजा)
- दुपारी ४:३० वा. आडवली ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांना भेटतील. (स्थळ: ग्रामपंचायत कार्यालय, आडवली, ता. लांजा)
या दौऱ्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कोणतेही पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू आणू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. आमदार सामंत यांच्या या दौऱ्यामुळे ग्रामस्थांना थेट लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या समस्या मांडण्याची संधी मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी श्री. रमजान गोलंदाज (९९६०४१६६८३), श्री. परेश खातू (९९७५१७०१००) किंवा श्री. फैसल मुल्ला (८६०००८२३३३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.













