खेडमध्ये जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणामध्ये नावे बदलली

खेड : खेड तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गणांची नावे बदलण्यात आली असून जिल्हा परिषद गट ७ तसेच पंचायत समिती गणांची संख्या १४ आहे. मागील निवडणुकीतदेखील अशीच संख्या होती. यावेळेला जिल्हा परिषद गट आणि गणांमध्ये मतदार संख्या वाढल्यामुळे त्या गणांची व गटांची नावे बदलण्यात आली आहेत. ज्या गट आणि गणामध्ये मतदार संख्येमध्ये बदल झालेला नाहीत अशा गट आणि गणांची नावे जशीच्या तशी ठेवण्यात आलेली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तशी सूचना दिल्यामुळे हा बदल करण्यात आला अशी माहिती पंचायत समिती कार्यालयातून देण्यात आली.

जुनी रचना अशी-
जिल्हा परिषद गट : १) भरणे, २) अस्तान, ३) फुरूस, ४) सुसेरी, ५) धामणदेवी, ६) लोटे, ७) भोस्ते.

पंचायत समिती गण भरणे, शिरवली, भोस्ते, गुणदे, अस्तान, तळे, फुरूस, चिंचघर, सुसेरी, पन्हाळजे, धामणदेवी, शिव बुद्रुक, लोटे, धामणंद.

नव्या बदललेल्या मतदार संख्येनुसार झालेला बदल असा नवीन जिल्हा परिषद गट नावेः १) सुकिवली, २) भरणे, ३) भडगाव, ४) दयाळ, ५) विराचीवाडी, ६) लोटे, ७) धामणदेवी

पंचायत समिती गणः सुकिवली, तिसंगी, खवटी, भरणे भडगाव, जामगे, दयाळ, बहिरवली, गुणदे, विराचीवाडी, लोटे, आंवडस, आंजणी, धामणदेवी.

मागील निवडणुकीत जिल्हा परिषद गटातून सदस्य म्हणून अरुण गंगाराम कदम, सिद्धी सचिन पवार, सुनील बाबाराम मोरे, राजेंद्र दत्ताराम आंब्रे, अरविंद लक्ष्मण चव्हाण, नफिसा हसमत परकार, स्वप्नाली रोहन पाटणे.

पंचायत समिती गणातून अनुक्रमे
अपर्णा अनिल नक्षे, संजय काशिनाथ आंब्रे, विजय श्रीपत कदम, जीवन गोविंद आंब्रे, राजेंद्र दगडू कदम, तुकाराम लक्ष्मण डफळे, भाग्यश्री भालचंद्र बेलोसे, पूजा अजित भोसले, कृष्णा बंडू लांबे, स्वानंदी श्रीधर गवळी, गणेश तुळशीराम मोरे, मानसी महेश जगदाळे, अनिता अनिल खेराडे, समीक्षा संदेश जाधव हे निवडून आले होते. या सदस्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून शिवसेनेचे ४, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ सदस्य होते. पंचायत समिती गणाकरिता शिवसेनेचे ८, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ५ सदस्य निवडून आले होते. एक सदस्य मानसी जगदाळे या अपक्ष निवडून आल्या होत्या. त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळे शिवसेना नेते रामदास कदम यांनी त्यांना सभापती पदाची संधी दिली होती. सेनेकडून अपर्णा नक्षे व विजय कदम यांनाही सभापतीपदी संधी देण्यात आली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 24/Jul/2025