चिपळूण, २४ जुलै : तालुक्यातील पिंपळी खुर्द येथील शालीन रेसिडेन्सीमध्ये एका डॉक्टर महिलेच्या घरातून अज्ञात चोरट्याने ११,५०० रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही चोरी २२ जुलै रोजी सकाळी ८:३० ते सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास घडल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी काशीफा चाँद शिकलगार (वय २७, शिक्षण एम.फार्म), रा. शालीन रेसिडेन्सी, पिंपळी खुर्द, ता. चिपळूण (मूळ रा. समर्थ कॉलनी, सैदापूर, ता. कराड, जि. सातारा) यांनी चिपळूण पोलिसांत फिर्याद दिली आहे. शिकलगार या दादर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरी करतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी फिर्यादीची रूम कुलूपबंद असताना, अज्ञात चोरट्याने किचनमधील खिडकीतून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममध्ये ठेवलेल्या पर्समधून ११,५०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ (अ) आणि ३३१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 24-07-2025














