रत्नागिरी, २४ जुलै : रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला, शिवलकर वाडी येथील लोहार गल्लीत झाडाझुडपांच्या आडोशाला सुरू असलेल्या ‘कल्याण मटका’ जुगारावर रत्नागिरी शहर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण ८१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही घटना काल, २३ जुलै २०२५ रोजी दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास घडली. पोलीस हवालदार कशल सुरेश हातिसकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राकेश विजय मोरे (वय ४९, रा. घर नं. ३७३१, रोड, मिरकरवाडा उर्दूशाळा जवळ, पेठकिल्ला, ता. जि. रत्नागिरी) हा आरोपी कल्याण मटका जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम आपल्या ताब्यात बाळगून, बेकायदेशीरपणे आणि परवान्याशिवाय कल्याण मटका जुगार खेळ खेळवत असताना मिळून आला.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा (गु.र.नं. ३३०/२०२५) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीकडून ८०५ रुपये रोख रक्कम आणि इतर जुगाराचे साहित्य असा एकूण ८१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 24-07-2025














