Ratnagiri : एसटी महामंडळाच्या स्मार्टकार्ड योजनेला उतरती कळा..

रत्नागिरी : ज्येष्ठ नागरिक लालपरीतून प्रवास करीत असताना एसटी महामंडळाच्या वतीने त्यांना विशेष सवलत जाहीर करण्यात आली होती. यात आधारकार्ड, मतदानकार्ड ऐवजी एसटीचे स्मार्टकार्ड देण्याची योजना सुरू केली. पंरतु या योजनेला उतरती कळा लागत असून कित्येक स्मार्ट कार्ड एसटी आगारातच पडून आहेत. जिल्ह्यात स्मार्टकार्ड योजना बंद झाली असून आता सवलत घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आधारकार्ड दाखवावे लागत त्यामुळे पूर्वीप्रमाणे जुनेच कामाचे दाखवून सवलतधारकांना प्रवास करावा लागत आहे.

एसटी महामंडळाच्या वतीने पूर्वी ज्येष्ठांना तहसील कार्यालयातून मिळणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दाखल्याच्या आधार एसटीची सवलत मिळते. मात्र त्यांना वयाचा पुराव्यासाठी बनावट आधारकार्ड बनवून काहीजण वय वाढवल्याचे प्रमाण वाढले त्याचबरोबर एसटी महामंडळाच्या सवलतीत प्रवास करणाऱ्यांना मागील नऊ वर्षांपूर्वी स्मार्टकार्ड पध्दत सुरू केली. त्याचबरोबर शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एसटीची सवलत दिली जाते. तसेच विशेष प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही स्मार्टकार्ड पध्दत सुरू केली होती. तसेच शाळा, महाविद्यालयातून प्रवास करणाऱ्या अन्य पासधारकांना प्रवाशांनादेखील स्मार्टकार्ड देण्यास सुरूवात झाली. मात्र मागील दोन वर्षापासून ही स्मार्ट कार्ड योजनाच बंद करण्यात आली आहे, तर आता जुन्याच पध्दतीने ज्येष्ठांना आधारकार्ड दाखवून सवलत दिली जातेय, शाळा, महाविद्यालय, विशेष सवलत घेणाऱ्या प्रवाशांना कागदी पासेस देण्यात येत आहेत.

९ वर्षांपूर्वी स्मार्ट कार्ड योजना सुरू
ज्येष्ठांसह विविध प्रवाशांच्या सवलतीसाठी मागील २०१६ सालापासून एसटीच्या वतीने स्मार्टकार्ड योजना सुरू केली. एटीएम कार्डसारखे अद्यवायत असे स्मार्टकार्ड विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक, अन्य पासधारकांना पासधारकांचे स्मार्ट ओळखपत्र बनले. ते ओळखपत्र स्कॅन केल्यावर नोंदणी मशीनमध्ये केली जात होती. ज्या कंपनीला स्मार्टकार्ड तयार करण्याचे काम दिले होते त्याच कंपनीने तांत्रिककामात बिघाड असल्याचे कारण पुढे केले आणि सर्व्हरची समस्या निर्माण झाल्याने नुतनीकरणासाठी, नवीन कार्ड काढण्यासाठी काम थांबवल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून ज्येष्ठ नागरिकांना आता आधार कार्डच्या व विद्यार्थ्यांना कागदी पासच्या भरवशावर प्रवास करावा लागत आहे.

स्मार्टकार्ड योजना मागील काही वर्षांपासून बंदच आहे. त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये म्हणून ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्डद्वारे एसटीतून प्रवास करण्याची व्यवस्था केली आहे. – सचिन यादव, वाहतूक नियंत्रक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 24/Jul/2025