राजापूरमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त

राजापूर, २४ जुलै : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूची अवैधरित्या विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २० सीलबंद दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून, त्याची किंमत ६०० रुपये आहे.

ही घटना काल, २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७:१८ वाजण्याच्या सुमारास राजापूर-भु बाजारपेठ रस्त्यावर, भु बाजारपेठेपासून १०० मीटर अंतरावर घडली. राजापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल संभाजी विलास कदम यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश शिवाजी खालविलकर (वय २५, रा. राजापूर, खडपेवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) हा व्यक्ती २० सीलबंद गोवा बनावटीच्या दारूच्या प्लास्टिकच्या बाटल्या बेकायदेशीरपणे आणि परवान्याशिवाय विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यात बाळगून असताना पोलिसांना मिळून आला.

या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा (गु.र.नं. १३५/२०२५) दाखल करण्यात आला आहे. राजापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 24-07-2025