रत्नागिरी : अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरण जाणीवजागृती अभियान मंडळाचे उद्घाटन कासव संवर्धन तज्ज्ञ व अभ्यासक मोहन उपाध्ये यांच्या हस्ते झाले.
या वेळी उपाध्ये यांनी कोकण किनारपट्टीवरील कासव संवर्धनाची माहिती दिली. किनारपट्टीवरील आढळणाऱ्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या संवर्धनाची विस्तृत माहिती सांगितली. महाराष्ट्र शासन, वनविभाग, कांदळवन कक्ष आणि भारतीय वन्यजीव संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नातून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रथमतः केलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या सॅटेलाइट टॅगिंग या प्रकल्पाचीसुद्धा माहिती व्हिडिओच्या माध्यमातून दिली. मंडळाच्या समन्वयक स्मिता पाथरे यांनी मंडळाद्वारे वर्षभरातील होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला. सद्यःस्थितीतील निसर्गाला हानी न पोहोचवणे हे देखील एक प्रकारचे निसर्ग संवर्धनच होय, असे स्पष्ट करून पर्यावरण संवर्धनासाठी स्वतःपासून सुरुवात करण्याचे आवाहन अध्यक्ष प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 24/Jul/2025














