चिपळूण : गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीविरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची सोमवारी (ता. २१) मुंबई येथे सुनावणी झाली. यामध्ये प्रदूषण नियंत्रण महामंडळाने ‘त्या’ कंपनीला झिरो वॉटर डिस्चार्जचा प्रकल्प अहवाल येत्या सहा दिवसांत सादर करा, असा आदेश दिला आहे. त्यानंतरच या संदर्भात निर्णय होणार आहे.
संबधित कंपनीच्यावतीने सोडण्यात येणारे सांडपाणी टँकरद्वारे पश्चिम महाराष्ट्रात नेण्यात येते. त्यासाठी ठेका देण्यात आला आहे; मात्र, ठेकेदाराच्या टैंकरमधील सांडपाणी कामथे येथील धरणात सोडल्यानंतर कापसाळ व कामथे येथील लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. अखेर या पाण्याचे नमुने एमपीसीबी व आरोग्य विभागाने घेतले. त्याचा आता अहवालदेखील आला आहे. या घटनेनंतर एमपीसीबीकडून कंपनीला बंदची नोटीस देण्यात आली.
महावितरण व एमआयडीसीला वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार एमआयडीसीने पाणीपुरवठा खंडित केला होता; मात्र, कंपनी व्यवस्थापनाने केलेल्या विनंतीनुसार, आता कंपनीचे उत्पादन सुरूच आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 24/Jul/2025














