खेड : नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जात आहे. खरीप हंगामाकरिता भात, मका, तूर, मूग, सोयाबीन, कापूस, कांदा आदी अधिसूचित पिकांसाठी शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे, अशी माहिती खेड तालुका कृषी अधिकारी रवींद्र माळी यांनी दिली.
शेतकऱ्यांकडे अॅग्रिस्टेक नोंदणी क्रमांक व ई पीक पाहणी आवश्यक असून कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. चुकीची माहिती दिल्यास विमा रद्द होईल व हप्ता जप्त केला जाईल. शेतकऱ्यांनी सीएससी केंद्रावर फक्त शासन निर्धारित ४० रुपये शुल्क भरावे. अधिक माहितीसाठी कृषी विभाग, विमा कंपनी प्रतिनिधी किंवा हेल्पलाईन १४४४७ वर संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 24/Jul/2025














