मंडणगड : धुत्रोली येथील शिवस्मारक भवन सभागृहात मंगळवारी आयोजित भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यात मंडणगड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची विस्तृत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी माजी आमदार विनय नातू, माजी आमदार सूर्यकांत दळवी, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतिश मोरे, माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, जिल्हा सरचिटणीस विश्वदास लोखंडे, माजी तालुका अध्यक्ष अप्पासाहेब मोरे, तालुका अध्यक्ष प्रविण कदम, सरचिटणीस गिरीश जोशी, चिटणीस वैभव नारकर, अमोल बोभस्कर, वसंत ताम्हणकर, नागेश धाडवे, मिहीर महाजन, मकरंद म्हादलेकर, रविकुमार मिश्रा, शैलेश तपकिरे, श्रीकृष्ण साठे यांच्यासह तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष सतिश मोरे यांनी जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचा संगम साधत संघटनात्मकरित्या पार्टीचे काम पुढे न्यायचे असल्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. लोकांमध्ये मिसळून आपले प्रभावक्षेत्र निर्माण करुन शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना तळगाळात नेऊन पार्टीचे काम अधिक गतीने पुढे नेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तालुकाध्यक्ष प्रवीण कदम यांनी मंडणगड तालुक्यात पक्षाची विकासात्मक कामगिरी, तालुका पातळीवर पक्षाचा होत असलेला विस्तार यासंदर्भात माहिती दिली.
यानंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देण्यात आली. याचबरोबर पार्टीचे वेगवेगळ्या आघाड्यांच्या साठ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. यात तालुका उपाध्यक्षपदी राजेश नगरकर, महेश दळवी, दत्ताराम महाडीक, विनोद दळवी, तन्वी महाजन, सरचिटणीसपदी तुषार येरुणकर, यश मेहता, चिटणीसपदी मंगला पवार, एकनाथ चव्हाण, महेश कंचावडे, वैभव नारकर, प्राची कदम, सुषमा घोगरेकर, कोषाध्यक्षपदी राजेश दळवी, महिला मोर्चा तालुका अध्यक्षपदी श्वेता महाडीक, युवा मोर्चा अध्यक्षपदी मकरंद रेगे, ओबीसी सेल अध्यक्षपदी कल्पेश गांधी या प्रमुख सेलसह साठ वेगेवगळ्या आघाड्यांच्या प्रतिनिधींची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
यानिमित्त पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी निवड झालेले माजी आमदार सूर्यकांत दळवी व जिल्हा सरचिटणीस विश्वदास लोखंडे यांचा तालुका शाखेच्या वतीने विशेष सत्कारही करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:10 PM 24/Jul/2025














