संस्कृत सप्ताहानिमित्त रत्नागिरीत निःशुल्क योग प्रमाणपत्र वर्ग

रत्नागिरी : कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेकचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र यांच्यावतीने संस्कृत सप्ताहानिमित्त १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत दररोज सायंकाळी ५:३० वाजता निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा अभ्यासक्रम भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र अरिहंत मॉल, तिसरा मजला, बसस्टँड जवळ, रत्नागिरी येथे होणार आहे. नोंदणीसाठी https://forms.gle/D3cqWXj5Ns CuqEQe8 या लिंकवर किंवा प्रा. अक्षय माळी यांच्याशी संपर्क साधावा.

हा अभ्यासक्रम सर्वांसाठी खुला असून विनामूल्य ठेवण्यात आला आहे. योगामध्ये रस असणाऱ्या विशेषतः महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:06 PM 24/Jul/2025