लांजात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे महामार्गावर आंदोलन

लांजा : ‘मत कोणालाही द्या, शेतकऱ्यांसाठी एक व्हा’ अशा जोरदार घोषणा देत गुरुवारी लांजा येथे मुंबई-गोवा महामार्ग व तहसील कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या जिल्हा शाखेने आंदोलन छेडण्यात आले. यावेळी लांजा तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे संस्थापक-अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी व दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रत्नागिरी लांजा, राजापूर, रत्नागिरी, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर व मंडणगडमधून संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह दिव्यांग, शेतकरी, मेंढपाळ, मच्छीमार, कामगार सहभागी झाले होते.

यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी लांजा तहसील परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. रत्नागिरी जिल्हा शाखेचे अध्यक्ष आनंद त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. मुंबई-गोवा महमार्ग त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यलयात भूमिका मांडत चर्चा केली यावेळी निवेदन दिले. नायब तहसीलदार अनिल गोसावी यांनी निवेदन स्वीकारले.

या आंदोलनात प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रत्नागिरी जिल्हा शाखेचे उपजिल्हाध्यक्ष गौतम सावंत, संजय सुर्वे, अशोक भुस्कुटे, बंटी सुर्वे, सुर्वे, राजापूर तालुका अध्यक्ष जैनुद्दीन बोबडे, गणेश चव्हाण यांसह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 25/Jul/2025