महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत ७५ पदांची भरती! ट्रेनी ऑफिसर, असोसिएट, टायपिस्ट, ड्रायव्हर आणि शिपाई पदांसाठी संधी

मुंबई: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाईसाठी एक सुवर्णसंधी! महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड (MSC Bank) (दी विदर्भ को-ऑप. बँक लिमिटेड अंतर्भूत), मुंबई यांनी विविध पदांसाठी एकूण ७५ रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. यामध्ये ट्रेनी ऑफिसर्स (ज्युनियर ऑफिसर ग्रेड), ट्रेनी असोसिएट, ट्रेनी टायपिस्ट (असोसिएट ग्रेड), ट्रेनी ड्रायव्हर्स आणि ट्रेनी प्यून या पदांचा समावेश आहे.

आमच्या नोकरी विषयक WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

भरती प्रक्रियेतील ठळक मुद्दे:


१. ट्रेनी असोसिएट्स (एकूण ५० पदे)

  • पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण (१० वी मराठी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक).
  • प्राधान्य: मराठी ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. टायपिंगचे शासकीय कमर्शियल प्रमाणपत्र असल्यास.
  • वयोमर्यादा: (१ जून २०२५ रोजी) २१ ते २८ वर्षे.
  • स्टायपेंड/वेतन: १२ महिन्यांच्या ट्रेनिंग दरम्यान दरमहा रु. २५,०००/- स्टायपेंड. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर ‘असोसिएट’ पदावर (वेतन दरमहा रु. ३४,०००/-) कायम केले जाईल. १२ महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर ६ महिन्यांचा प्रोबेशन कालावधी असेल.

२. ट्रेनी ज्युनियर ऑफिसर (एकूण १४ पदे)

  • पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण (१० वी मराठी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक).
  • प्राधान्य: विधी पदवी/पदव्युत्तर पदवीधारक किंवा JAIIB/ CAIIB/ MS-CIT सर्टिफिकेशन किंवा ट्रेझरी/इंटरनॅशनल बँकिंग डिव्हिजनमधील कामाचा अनुभव असल्यास.
  • अनुभव: बँकिंग क्षेत्रातील २ वर्षांचा ऑफिसर पदावरील अनुभव (शक्यतो अर्बन/डीसीसी बँकेमधील).
  • वयोमर्यादा: (१ जून २०२५ रोजी) २३ ते ३२ वर्षे.
  • स्टायपेंड/वेतन: १२ महिन्यांच्या ट्रेनिंग दरम्यान दरमहा रु. ३०,०००/- स्टायपेंड. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर ‘ज्युनियर ऑफिसर’ पदावर (वेतन दरमहा रु. ५२,०००/-) कायम केले जाईल. ट्रेनिंगनंतर ६ महिन्यांचा प्रोबेशन कालावधी असेल.

३. ट्रेनी टायपिस्ट (असोसिएट ग्रेड) (एकूण ९ पदे)

  • पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण (१० वी मराठी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक). मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. वेगाचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र आवश्यक.
  • इतर: कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स (वर्ड प्रोसेसिंग आणि स्प्रेडशीट) मधील प्रावीण्य असावे. मराठी/इंग्रजी स्टेनोग्राफी शिकलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
  • अनुभव: अनुभव आवश्यक नाही, परंतु डीटीपी ऑपरेटर कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
  • वयोमर्यादा: २१ ते २८ वर्षे.
  • स्टायपेंड/वेतन: १२ महिन्यांच्या ट्रेनिंग दरम्यान दरमहा रु. २५,०००/- स्टायपेंड. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर ट्रेनींना बँकेत रु. ३४,०००/- दरमहा वेतनावर कायम केले जाईल, शिवाय दरमहा रु. ६५०/- टायपिस्ट भत्ता दिला जाईल. ट्रेनिंगनंतर ६ महिन्यांचा प्रोबेशन कालावधी असेल.

४. ट्रेनी ड्रायव्हर्स (एकूण ६ पदे)

  • पात्रता: १० वी उत्तीर्ण (१० वीला मराठी एक विषय असावा) आणि हलके मोटर वाहन चालविण्याचा परवाना.
  • अनुभव: आवश्यक नाही.
  • वयोमर्यादा: १८ ते ३० वर्षे.
  • स्टायपेंड/वेतन: १२ महिन्यांच्या ट्रेनिंग दरम्यान दरमहा रु. २२,०००/- स्टायपेंड. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर ट्रेनींना बँकेत रु. २७,०००/- दरमहा वेतनावर कायम केले जाईल. ट्रेनिंगनंतर ६ महिन्यांचा प्रोबेशन कालावधी असेल.

५. ट्रेनी प्यून (एकूण ५८ पदे)

  • पात्रता: १० वी (मराठी विषयासह) उत्तीर्ण.
  • प्राधान्य: इलेक्ट्रिशियन/प्लंबिंग कोर्स केला असल्यास.
  • वयोमर्यादा: १८ ते ३० वर्षे.
  • स्टायपेंड/वेतन: १२ महिन्यांच्या ट्रेनिंग दरम्यान दरमहा रु. २०,०००/- स्टायपेंड. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर ट्रेनींना बँकेत रु. २४,५००/- दरमहा वेतनावर कायम केले जाईल. ट्रेनिंगनंतर ६ महिन्यांचा प्रोबेशन कालावधी असेल.

निवड प्रक्रिया आणि अर्ज शुल्क

  • निवड पद्धती:
    • ट्रेनी असोसिएट आणि ट्रेनी ज्युनियर ऑफिसर पदांसाठी: IBPS मार्फत ऑनलाइन परीक्षा आणि बँकेमार्फत इंटरव्ह्यू.
    • ट्रेनी प्यून आणि ट्रेनी ड्रायव्हर पदांसाठी: ऑनलाइन लेखी परीक्षा.
  • ऑनलाइन परीक्षेचा नमुना (ट्रेनी असोसिएट): १६० प्रश्न, २०० गुण, वेळ २ तास. (रिझनिंग ऍबिलिटी अँड कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड – ४० प्रश्न, ८० गुण; इंग्लिश – ४० प्रश्न, ४० गुण; रिझनिंग ऍबिलिटी अँड कॉम्प्युटर ऍबिलिटी – ४० प्रश्न, ४० गुण; क्वांटिटेटिव्ह अँड न्यूमरिकल ऍबिलिटी – ४० प्रश्न, ४० गुण.)
  • अर्जाचे शुल्क: फक्त ऑनलाइन मोडने भरावयाचे आहे. ट्रेनी ज्युनियर ऑफिसर पदासाठी रु. १,७७०/- (जीएसटीसह); इतर पदांसाठी रु. १,१८०/-.

महत्त्वाची सूचना: उमेदवार फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याच्या दिवशी उमेदवार पदवीधर नसल्यास, बँकेत रुजू झाल्यावर पदवी प्राप्त केल्यास १० वर्षांच्या सेवेनंतर त्यांना प्रमोशन मिळू शकेल.

अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, https://www.mscbank.com/career.aspx या संकेतस्थळाला ६ ऑगस्ट २०२५ पर्यंत भेट द्या. शंकासमाधानासाठी hrdm@mscbank.org.in या ईमेलवर संपर्क साधा.