रत्नागिरी : शहराजवळील शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी स्थानिक माशांच्या प्रजाती आणि पर्यावरणाचे संवर्धन या विषयावर वसुंधरा निसर्ग संवर्धन संस्थेचे प्रमुख प्रमोद माळी यांचे व्याख्यान झाले.
माळी यांनी विविध स्थानिक माशांच्या प्रजाती, त्यांचे प्रजनन कसे करावे तसेच पर्यावरणाचे संवर्धन विषयावर माहिती दिली. या वेळी प्राचार्य डॉ. केतन चौधरी, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे साहाय्यक प्रा. डॉ. राकेश जाधव, नीलेश मिरजकर, रोहित बुरटे, सुशील कांबळे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 25/Jul/2025














