चिपळूण : वहाळमध्ये चारसूत्री भात लागवडीचं प्रात्यक्षिक

चिपळूण : ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गोविंदराव निकम कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण येथील विद्यार्थिनींनी वहाळ गावात चारसूत्री भात लागवडीचा प्रात्यक्षिक प्रयोग राबवला. हे प्रात्यक्षिक स्थानिक शेतकरी सुधीर गुढेकर यांच्या शेतात यशस्वीरीत्या पार पडले.

वहाळमधील शेतकऱ्यांना नैसर्गिक नत्रनिर्मिती व जैविक शेतीचे फायदे विद्यार्थिनींनी समजावून सांगितले. खतांचे झाड व गिरीपुष्प शेतात वापरून जमिनीत जैविक नत्रनिर्मिती करता येते, ज्यामुळे रासायनिक खतांचा वापर टाळता येतो आणि मातीची सुपीकता टिकून राहते. युरियासारख्या रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक खतांनीही उत्पादन वाढवता येते. ही पद्धत जमिनीच्या आरोग्याकरिता फायदेशीर असल्याचे शेतकऱ्यांना दाखवून दिले.

शेतकरी सुधीर गुढेकर आणि परिसरातील इतर शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले तसेच प्रा. सकपाळ यांचे मार्गदर्शन लाभले. प्रात्यक्षिकात अनुष्का पाटील, सई भोसले, सावित्री गुब्याड, लावण्या पांढरे, गीतांजली शिंदे, अपूर्वा काटे, समृद्धी पाटील, ईशा शेख, गौरी बुरूंगले, पायल भोसले, स्वप्नाली हंजगी या कृषिकन्यांनी सहभाग घेतला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 25/Jul/2025