चिपळूण : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत कुटरे गावाची पाहणी

अडरे : स्वच्छ भारत मिशन टप्पा २ च्या अंतर्गत केंद्रस्तरीय पथक प्रमुख विराज गुरव व त्यांच्या सहकाऱ्यांनी चिपळूण तालुक्यातील कुटरे ग्रामपंचायत येथे तपासणी करण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण २०२५ च्या निकषानुसार शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक स्वच्छतागृह व परिसराची पाहणी करण्यात आली. याचबरोबर गावातील शोष खड्डे, हॅण्डवॉश स्टेशन, परसबाग निर्मिती, रस्ते सफाई, गांडूळ खत प्रकल्प यांची पाहणी केली. शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला व समाधान व्यक्त केले.

यावेळी सरपंच संजीव कुमार गुजर, उपसरपंच सुरभी जाधव, ग्रामपंचायत सदस्य राजू होवले, अमरदीप कदम, अंगणवाडी सेविका, सीआरपी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गटविकास अधिकारी उमा घारगे, अजित माजगावकर, सहायक गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर, विस्तार अधिकारी बी.डी. कांबळे, बी.बी. पाटील, एम.जे. केळसकर, बी.आर.सी लाड व राजेशिर्के यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 25/Jul/2025