मंडणगड : रास्त भाव दुकानासाठी तहसील कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन

मंडणगड : तालुक्यातील राजीनामा व अन्य कारणामुळे रिक्त असलेल्या सात गावांतील रास्त भाव दुकानासाठी दि. ३१ जुलैपर्यंत मंडणगड तहसील कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.

तालुक्यातील आंबवणे बुद्रुक, उंबरशेत, बोरखत, कांटे, वेसवी, वलौते, नारायणनगर या गावातील रास्त भाव धान्य दुकान परवाना मंजुरीसाठी जाहीरनामे काढण्यात आले आहेत. ही दुकाने चालवण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींनी ३१ जुलैपर्यंत तहसील कार्यालयाकडे आपले अर्ज सादर करावेत, अशी सूचना करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:41 PM 25/Jul/2025