दापोली : डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाच्या सहकार्याने दाभोळ येथील सागरपुत्र प्रतिष्ठान सभागृहात शनिवार, दि. २६ जुलै मोफत आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत होणार आहे.
या शिबिरात मोतीबिंदू मुतखडा, एंजियोप्लास्टी, बायपास, गुडघे बदलणे सारख्या अनेक शस्त्रक्रिया मोफत होण्यासाठी तपासणी आणि नोंदणी होणार आहे. या शिबिराच्या माहितीसाठी अविनाश काष्टे यांच्याशी संपर्क करावा. या शिबिराचा लाभघेण्याचे आवाहन कोळथरेतील मिहीर दीपक महाजन यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 25/Jul/2025














