चिपळूण : चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांच्या नेतृत्वाखाली तालुका कार्यकारिणीत आणखी तीन पदांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये निवळीचे अनिल रेपाळ व पोफळीचे सचिन पवार यांची उपाध्यक्षपदी, तर सावर्डेचे कमलेश देसाई यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून चिपळूण काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आठवडाभरात विविध पदांची नियुक्ती करण्यात आली.
मंगळवारी विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काही पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी अनिल रेपाळ, सचिन पवार, कमलेश देसाई यांना तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी शाह यांच्या समवेत सेवा दल तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, नंदकुमार कामत, दादा आखाडे, उपाध्यक्ष संजय जाधव, सहसचिव कमलेश देसाई, उपाध्यक्ष अनिल रेपाळ, महिला तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, सफा गोठे, मिलन गुरव आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 17/Oct/2024













