गणपतीपुळेतील समुद्रात उंचच उंच लाटा; पर्यटकांना अलर्ट!

रत्नागिरी : महाराष्ट्रासह देशभरातली पर्यटकांचं आवडतं पर्यटनस्थळ म्हणजे कोकण, याच कोकणातील अनेक समुद्रकिनाऱ्यांपैकी एक, पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण म्हणजे गणपतीपुळे. दरवर्षी हजारो पर्यटक गणपतीपुळेला भेट देतात.

मुंबईसह कोकणात गेल्या 4 दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावल्याने समुद्राला भरती आली असून मुंबईसह कोकणच्या समद्रकिनाऱ्यांनाही अलर्ट देण्यात आला आहे.

रत्नागिरीतील समुद्राला सध्या उधाण आलं आहे, समुद्राच्या उधाणाचं पाणी प्रसिद्ध अशा गणपतीपुळे मंदिराच्या भिंतीपर्यंत लागले असून पर्यटक पाण्यात भिजण्याचा आनंद घेत आहेत.

समुद्रात जाणाऱ्या, समुद्रकिनारी पाण्यात भिजण्याचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्राला भरती आल्याने सुमुद्रात न जाण्याच्या सूचनाही पर्यटकांना आहेत.

मंदिर परिसरात समुद्राच्या खवळलेल्या उंच-उंच लाटा देखील यावेळी उसळल्या आहेत, रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पण, सध्या पावसाने मात्र विश्रांती घेतली आहे.

गणपतीपुळे मुख्यतः गणपतीच्या जुन्या मंदिरासाठी ओळखले जाते जे मुख्य आकर्षण आहे. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील गणपतीपुळेमध्ये आकर्षक समुद्र किनारा आहे.

समुद्रकिनारा आणि गणपती मंदिरासह येथे विविध पर्यटन स्थळे आहेत. गणपतीपुळेपासून सुमारे 2 कि.मी. अंतरावर मालगुंड हे प्रसिद्ध कवी केशवसुतचे यांचे जन्मस्थान असून गावामध्ये त्यांचे स्मारक आहे.

जयगड किल्ला, प्राचिन कोंकण संग्रहालय, आरे वारे समुद्र किनारा हे गणपतीपुळेजवळील इतर आकर्षणे आहेत. गणपतीपुळे मध्ये पर्यटकांच्या राहण्यासाठी मोठ्या संख्येने रिसॉर्ट्स आणि हॉटेल आहेत, तसेच राज्य शासनाचे MTDC चे निवास्थान सुद्धा जवळच उपलब्ध आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:28 25-07-2025