खेड : येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड (रत्नागिरी) संचालित कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्यामंदिर, भडगाव (उच्च माध्यमिक विभाग) या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय शालेय वुशू स्पर्धेत यश संपादन केले आहे.
तन्मय सुर्वे, आर्यन दळवी, क्षितीज भोसले, निशांत शेडगे या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. तर श्रीयन थरवळ, विनायक पोवार या विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल प्राप्त केले आहे. गोल्ड मेडल प्राप्त चार खेळाडूंची पुढे होणाऱ्या विभागीय वुशू स्पर्धेकरिता निवड झाली आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता क्रीडा शिक्षक संतोष भोसले यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त पेराज जोयसर, दीपक लढ्ढा, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे यांनी अभिनंदन केले. या स्पर्धा क्रीड व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व रत्नागिरी जिल्हा क्रीड परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:00 PM 17/Oct/2024