गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर काळ्या डांबराचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. समुद्रातून बाहेर पडणारे हे ऑईल मिश्रित काळे डांबर असल्याने हे डांबर समुद्रावर फेरफटका मारण्यासाठी उतरणाऱ्या पर्यटकांच्या पायाच्या तळव्यांना तसेच चपलांना चिकटत असल्याचे चित्र दिसून आले आहे.
तसेच या काळ्या डांबराचे पर्यटकांमध्ये विशेष कुतूहल निर्माण होत असून हे ऑईल मिश्रित काळे डांबर नेमके कशामुळे समुद्रकिनाऱ्यावर येत असेल, असा प्रश्न पर्यटकांना पडतो. मात्र गणपतीपुळे येथील स्थानिक ग्रामस्थ व व्यावसायिकांकडून सांगितले जाते की, खोल समुद्रात मच्छीमारांच्या मोठमोठ्या बोटी असतात. त्या बोटीमधून मोठ्या प्रमाणात ऑईल बाहेर पडत असते. या ऑईलचे रूपांतर डांबरात होऊन काळे डांबर पावसाळ्यात दरवर्षी समुद्रकिनाऱ्यावर बाहेर येते. त्यामुळे यंदाही गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर हे काळे डांबर सर्वत्र पसरलेले दिसून येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 26/Jul/2025














