खेड : सुमारे साडेअकरा कोटी रुपये खर्च करून नव्याने दुरुस्त करण्यात आलेले मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र २७ जुलैपासून नागरिकांच्या सेवेसाठी रुजू होत आहे. या सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम तसेच पालकमंत्री उदय सामंत, रोजगार हमीमंत्री भरत गोगावले, नगर विकास व परिवहनमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, आ. शेखर निकम, भास्कर जाधव, किरण सामंत, जिल्हा अधिकारी एम. देवेंदर सिंह, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे उपस्थित राहणार आहेत.
मीनाताई ठाकरे नाट्यगृह २००७ पासून नादुरुस्त झाल्याने बंद अवस्थेत होते. त्यासाठी अनेकवेळा शासनाचा निधी खर्च करून दुरुस्त करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हे नाट्यगृह दुरुस्त झाले नाही. मध्यंतरी कोरोनानंतरच्या काळामध्ये दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी या नाट्यगृहाकडे जातीने लक्ष घालून राज्य शासनाकडून विशेष निधी प्राप्त करून घेतला. त्यानंतर ते स्वतः राज्यमंत्री झाल्याने या कामाला गती मिळाली. हे नाट्यगृहात लोकांच्या सेवेत रुजू होत आहे. २७ जुलै हा माजी मंत्री रामदास कदम यांचा वाढदिवस असल्याने या दिवशी या हे नाट्यगृह जनतेसाठी खुले करण्यात येत आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत त्यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे लोकार्पण होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 26/Jul/2025














