देवरूख : शेतीचे नुकसान करणाऱ्या गव्याला हाकवत असताना, गव्याने शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातील कुळे वाशी या गावांमध्ये घडली. शेतकऱ्याची प्रकृती सध्या व्यवस्थित आहे. गेली अनेक दिवस गवा रेड्यांनी धुमाकूळ गावात घातला असून, गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. याचसाठी शेतकरी देखील सध्या दिवसभर शेतामध्ये वावरून रेड्यांना पळवण्यासाठी सतर्क राहात आहेत.
अशाचप्रकारे शेतीची राखण करत असताना दोन दिवसांपूर्वी सीताराम सदाशिव गावडे (वय ५४) यांनी शेतात घुसलेल्या गाव्यांना हाकलवण्याचा प्रयत्न केला. ही दुपारची वेळ होती, हाकवत असतानाच गव्याने सीताराम गावडे यांच्यावर हल्ला चढवला. ही बाब आजूबाजूच्या शेतकऱ्यांना समजताच त्यांनी मोठा गोंगाट केला. यामुळे गवे पळून गेले. मात्र हल्ला केल्यामुळे गावडे यांच्या तोंडाला मोठा मार लागला. तत्काळ त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता, त्यांच्या ओठाला गंभीर जखम झाल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. जखमी शेतकऱ्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 26/Jul/2025














