संगमेश्वरातील बसस्थानकाजवळ खड्डे बुजवण्याचे काम सुरू

संगमेश्वर : संगमेश्वर बसस्थानकाजवळ रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. ही बाब सामाजिक कार्यकर्ते श्रीराम शिंदे यांनी आमदार शेखर निकम यांच्यापुढे मांडल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित विभागाला सूचना दिल्या. त्यानंतर खड्डे बुजवण्याची कार्यवाही सुरू झाली. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

संगमेश्वर बसस्थानकासमोर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे तिथून ये-जा करताना पादचाऱ्यांची मोठीच गैरसोय होत होती. पावसाचे पाणी या मोठ्या खड्यात साचून राहत होते. त्यामधून एखादे वाहन गेल्यानंतर तिथून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पाणी उडण्याचे प्रकार वारंवार घडत होते. तसेच खड्ड्यातून वाहने चालवणेही अडचणीचे झाले होते. याबाबत आमदार निकम यांनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाधव यांच्याशी संपर्क साधून खड्डा बुजवण्याचे आदेश दिले. त्यामुळे खड्डे बुजवण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे तसेच उर्वरित खड्डेदेखील लवकरच बुजवण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. यासाठी राकेश कदम, संदेश कापडी, संदीप कदम, दीपक भानुशाली, मलीक मापारी, प्रवीण कानसरे, समीर झगडे, संकेत कदम, अमोल साप्तीस्कर, संजय रहाटे, वैभव चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 26/Jul/2025