दापोली : असोंड गावातील नदीकिनारी मगर आढळल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट

गावतळे : दापोली तालुक्यातील असोंड गावातील नदीकिनारी २४ जुलैला दुपारी दोनच्या सुमारास मगर आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. वाकवली-उन्हवरे रस्त्यावरील असोंड हे एक महत्त्वाचे गाव असून, २४ जुलैला दुपारी गावांतील तंटामुक्ती अध्यक्ष रूपेश बुरबाडकर हे नदीकिनारी गेले असता नदीपात्राबाहेर मगर दिसली. बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश देवघरकर यांनी वनविभागाला फोन करून माहिती दिली, वनाधिकारी दापोली प्रकाश पाटील आणि त्याचे सहकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २५) जागेची पाहणी केली. या भागात शेती असल्याने ग्रामस्थांची ये-जा असते.

त्यामुळेच गावातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या मगरीला ताबडतोब पकडून ग्रामस्थांना दिलासा द्यावा.

असोंड येथील नदीकिनारी परिसरात पाहणी केली आहे. ग्रामस्थांनी किनारी भागात मगर पाहिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सुरक्षिततेसाठी तिथे गस्त घालणार आहोत- प्रकाश पाटील, वनाधिकारी, दापोली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 26/Jul/2025