संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी : आमदार शेखर निकम

चिपळूण : विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक दर्जा वाढीबरोबरच संस्कारक्षम पिढी निर्माण करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून उज्ज्वल भविष्यासाठी विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन परीक्षेत यश संपादन करावे व आपल्या आई-वडिलांसह सह्याद्रीचे नाव उज्ज्वल करावे. यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य सह्याद्रीकडून नेहमी केले जाईल, असे प्रतिपादन आ. शेखर निकम यांनी केले.

नुकत्याच जाहीर झालेल्या पूर्व प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सह्याद्रीच्या न्यू इंग्लिश स्कूल सती चिंचघरी विद्यालयाच्या दक्ष गिजये याने राज्य गुणवत्ता यादीत १४ वा क्रमांक प्राप्त केला आहे. न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज सती-चिंचघरी, दस्तुरी या विद्यालयाचे १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले असून, जिल्ह्यात पहिला क्रमांक प्राप्त करणारे हे विद्यालय ठरले आहे. इंग्लिश स्कूलचे ५, गोविंदराव निकम विद्यालयाचे ७, न्यू इंग्लिश स्कूल उभळे १ व धोंडीरामशेठ दाभोळकर इंग्लिश स्कूलच्या ३ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. या सह्याद्रीच्या सभागृहात गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी सचिव महेश महाडिक, युवा नेते अनिरुद्ध निकम, अभिनेते प्रभाकर मोरे, पालक, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 26/Jul/2025