चिपळुणात विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन

चिपळूण : उपमुख्यमंत्री अजित पवार वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे सक्षम तू हा विशेष मार्गदर्शन उपक्रम न्यू इंग्लिश स्कूल, पाग येथे झाला. यावेळी विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक मीरा महामुनी यांनी कायदेविषयक विविध महत्त्वाच्या मुद्यांवर – सायबर क्राईम, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, पास्को कायदा, स्वसंरक्षण आणि विद्यार्थ्यांवरील कायदेशीर परिणाम याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस दिशा दाभोळकर, शहराध्यक्षा अदिती देशपांडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख मनाली जाधव, जिल्हा उपाध्यक्षा रविना गुजर, तालुका उपाध्यक्षा पूर्वा आयरे, पोलिस कॉन्स्टेबल सुमेधा पांचाळ, मुख्याध्यापक शैलेश सुर्वे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 26/Jul/2025