खेड : घरडा अभियांत्रिकीमध्ये विद्यार्थ्यांसाठी नोकरीविषयक कौशल्य प्रशिक्षण

खेड : घरडा अभियांत्रिकी येथे ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आवश्यक ती कौशल्ये विकसित व्हावीत या हेतूने मल्टिप्लायर्सक्राफ्ट, बेंगळुरू या संस्थेच्या एमआयएलईद्वारे प्रशिक्षण प्रकल्पाबाबत दोन टप्प्यांत विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत प्रथम सत्रामध्ये दुसऱ्या, तिसऱ्या आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आली.

प्रकल्पामध्ये समाविष्ट घटकांमध्ये एप्टिट्यूड कौशल्ये, सौम्य कौशल्ये, उद्योजकता कौशल्ये तसेच शाखेनुसार तांत्रिक कौशल्यांचा समावेश आहे. दुपारी २ ते ३.२० या दुसऱ्या सत्रात विभाग प्रमुख, डीन आणि प्राचार्य यांच्यासाठी एमआयएलई प्रकल्पाची माहिती सादर करण्यात आली. यामध्ये प्रकल्पातील विविध कौशल्य प्रशिक्षणाबरोबरच शुल्क संरचना व इतर लाभ यांचे स्पष्टीकरण देण्यात आले. त्यानंतर दुपारी ३.२० ते ४ या वेळेत मल्टिप्लायर्सक्राफ्ट, बंगळुरूच्या प्रतिनिधींनी होशंग पटेल सेंटरला भेट दिली. या भेटीदरम्यान संस्थेतील विविध सुविधा व विद्यार्थ्यांनी केलेले प्रकल्प पाहण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर ताठरे व सर्व विभागाचे टी.पी.ओ. समन्वयक यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील, रजिस्ट्रार प्रा. संदीप मुघाटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहाकार्य लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 26/Jul/2025