सोमेश्वर येथील विश्वमंगल गोशाळेत गोमाता जतन, संवर्धन दिन उत्साहात

रत्नागिरी : सोमेश्वर (ता. रत्नागिरी) येथील सोमेश्वर शांतीपीठाच्या विश्वमंगल गोशाळेत शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी गोमाता पूजन आणि वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी संदेश लांजेकर व राकेश हरचिरकर यांचा गोसेवाव्रती म्हणून सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन अधिकारी डॉ. रोहित रानभरे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी कशाळकर, डॉ. स्वरूप काळे, हरचेरी बीटचे डॉ. विलास कोलगे, डॉ. आर. एस. कलगे, डॉ. रवींद्र केसरकर, सोमेश्वर शांतीपीठाचे अध्यक्ष राजेश आयरे, उपाध्यक्ष विनायक हातखंबकर, स्नेहल वैशंपायन, विनोद पेठकर, राकेश वाघ, प्रज्ञा मुळ्ये, छाया अनावकर, मनाली नाखरेकर, संदेश लांजेकर व अनेक गोप्रेमी, गोभक्त उपस्थित होते.

यावेळी डॉ. रोहित रानभरे यांनी देशी गाईचे महत्त्व व उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन केले. जलजीवन मिशन या संस्थेच्या माध्यमातून गोशाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. आयरे यांनी सोमेश्वर शांतीपीठ प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 26-07-2025