दापोली : शिवसेना नेते व महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री श्री. रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दापोली समुद्रकिनारी विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम यांच्या पत्नी सौ. श्रेया कदम यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. त्यांनी या उपक्रमाला दिशा दिली आणि स्वच्छतेबाबत जनजागृतीचा प्रभावी संदेश दिला.
या उपक्रमात युवासेना व युवतीसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समुद्रकिनारी पडलेला प्लास्टिक, कचरा आणि अन्य घातक वस्तू गोळा करून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.
स्वच्छता हीच खरी सेवा आहे, असा संदेश देत सहभागी सदस्यांनी ‘आपण आपला परिसर आणि ठिकाणे स्वच्छ ठेवली पाहिजेत’ असे आवाहन नागरिकांना केले. सौ. श्रेया कदम यांनी पर्यावरण रक्षणासाठी युवक-युवतींनी पुढे यावे, असा प्रेरणादायी संदेश दिला. या उपक्रमाचे दापोली वासीयांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले असून, अशा सामाजिक उपक्रमांमुळे नव्या पिढीत सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:12 26-07-2025














