साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव बाजारपेठेतील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. कोंडगाव बाजारपेठ ही पंचक्रोशीतील अनेक गावांची प्रमुख बाजारपेठ असून, याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, बसस्थानक, बँका, शाळा आणि हायस्कूल आहेत. त्यामुळे याठिकाणी सतत वर्दळ सुरू असते. मात्र, रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहन चालविणे अवघड झाले आहे.
या रस्त्यावरून चालताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कधी पादचारी या रस्त्यावरून चालताना खड्ड्यांमध्ये पडताहेत तर वाहने चालविणे म्हणजे जणू ‘साहसी खेळ’च ठरत आहे.
दरवर्षी हीच डोकेदुखी होत असूनही संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधीही दर्लक्ष करत आहेत. गणेशोत्सव एका महिन्याच्या अंतरावर आहे. त्यासाठी ग्रामस्थ गावात दाखल होणार आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी होत आहे. याबाबत उद्धवसेनेचे विभाग संपर्क प्रमुख महेंद्र मोरे यांनी सांगितले की, १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत कोंडगाव बाजारपेठेतील रस्त्याची दुरुस्ती झाली नाही, तर आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 26/Jul/2025














