राजापूर : कळसवली ग्रामपंचायतीचा ‘मियावाकी’ वनांच्या निर्मितीचा उपक्रम

राजापूर : वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन यातून पर्यावरणावर विशेष काम करणाऱ्या कळसवली ग्रामपंचायतीने आता माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत वृक्षलागवड व मियावाकी वनांची निर्मिती हे उपक्रम हाती घेतले आहेत.

गावात वृक्ष किती आहेत, कोणत्या प्रकारचे आहेत, किती जुने आहेत यांची माहिती घेऊन या ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी आणि ग्राम अधिकारी सोनाली आराख यांनी आगळा अहवाल तयार केला. या वृक्षांचे महत्त्व आणि त्यांची जपणूक याबाबत जनजागृती केली. या वृक्षसंपदेला पाणी किती लागते, गावात किती पाऊस पडतो, त्यापैकी किती पाणी जमिनीत मुरते, किती वाहून जाते असा जलआराखडाही या ग्रामपंचायतीने तयार केला. आता त्याहीपुढचे पाऊल ग्रामपंचायतीने टाकले आहे. आता मियावाकी वन निर्मितीवर भर दिला जाणार आहे.

या उपक्रमाच्या शुभारंभासाठी राजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी टी. बी. जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी नीलेश जगताप, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) बडद, विस्तार अधिकारी (कृषी) आपटे, विस्तार अधिकारी (कृषी) सावंत, सामाजिक वनीकरण विभागाच्या वनरक्षक बार्सिंग, ग्रामपंचायत अधिकारी हिवाळे, सरपंच देवेश तळेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, इतर ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. गटविकास अधिकारी जाधव यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तसेच स्वच्छ भारत मिशनच्या अॅपचा डेमो दाखवून उपस्थित ग्रामस्थांकडून अभिप्राय नोंदविण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 PM 26/Jul/2025