चिपळुणात नागरिकांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

चिपळूण : शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून चिपळूण नगर परिषदेतील ३.६० कोटी रुपये कामाचे भूमिपूजन दि. १४ रोजी शहरातील विविध प्रभागांतून आ. शेखर निकम यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते करण्यात आली.

शहरात चिपळूण नगर परिषद हद्दीतील विविध प्रभागांमध्ये शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून ३ कोटी ६० लाख रुपये निधीच्या माध्यमातून न. प. मालकीच्या मोकळ्या जागांमध्ये उद्याने, ओपन जीम, संरक्षक भिंत, फुलपाखरू उद्यान आदी विकासकामांचे भूमिपूजन आ. निकम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. उपनगर काविळतळी प्रभागात आरक्षित मोकळ्या १४४ क्रमांक जागेमध्ये फुलपाखरू उद्यान, खेळाचे मैदान या मोठ्या विकसीत प्रकल्पांचे भूमीपूजन करण्यात आले. यानंतर रामतीर्थ तलावानजीकच्या जलतरण तलावाचे नूतनीकरण, तसेच शहरातील विविध प्रभागात मोकळ्या जागांमध्ये ओपन जीमची सुविधा व काही ठिकाणी उद्याने विकसीत करणे कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधीक्षक मंगेश पेढांबकर, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, उद्यान विभागप्रमुख बापू साडविलकर, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक महेश जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, रेहाना बिजले, आदिती देशपांडे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 17/Oct/2024