गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुक्यातर्फे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शृंगारतळी कार्यालयात करण्यात आला.
पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित पाटपन्हाळे विद्यालयातील इ. पाचवी शिष्यवृत्तीधारक व गुणवंत विद्यार्थी सिद्धार्थ पाष्टे व कुशल पवार, इ. आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थिनी समृद्धी आंबेकर, मृण्मयी जाधव, (एनएमएमएस) राष्ट्रीय आर्थिक मागास विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक मृण्मयी जाधव या विद्यार्थ्यांचा गुहागर विधानसभा संपर्क प्रमुख प्रमोद गांधी यांच्या उपस्थितीत शृंगारतळीमधील मनसे कार्यालयात सत्कार करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM 17/Oct/2024









