रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील उमरोली जेटीजवळ शनिवारी दुपारी २.४५ वा. सुमारास महाड ते वेळास अशा वाहणाऱ्या सावित्री नदीच्या खाडीपात्रात उमरोली जेटीजवळ तेथील नागरिकांना एका अज्ञाताचा अंदाजे वय ३० ते ४० मृतदेह सापडला.
याबाबत त्यांनी बाणकोट पोलिस ठाण्यात खबर दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. याबाबत बाणकोट पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 28/Jul/2025













