संगमेश्वर : संगमेश्वर ते शृंगारपूर कातुर्डी मार्गावर धावणारी एस. टी. बस शनिवारी सकाळी कोंड उमरे येथील एका धोकादायक वळणावरून घसरली. मात्र, चालकाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. बस वळणावरून रस्त्याच्या कडेला घसरली. सुदैवाने चालकाने वेळेवर नियंत्रण मिळवल्याने बस दरीत जाण्याआधीच थांबली. या घटनेत एकाही प्रवाशाला गंभीर इजा झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप असून कोणतीही हानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या मदतीमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली.
या अपघाताने या मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघात प्रवण वळणांवर कठडे, योग्य पथदिवे, तसेच रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे, अशी जोरदार मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे. एस. टी. महामंडळाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 28/Jul/2025














