संगमेश्वर : तालुक्यातील उजगाव बौद्धवाडी येथील योगेश धोंडुराम सावंत (वय ४५) या तरुण चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी सुमारे ३ वाजता घडली. सावंत हे सीएनजी वाहनावर चालक म्हणून नोकरी करत होते.
नेहमीप्रमाणे ते डिंगणीहून देवरूखकडे परतत असताना अचानक त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांनी जवळच असलेल्या दुसऱ्या वाहनचालकाला याची कल्पना दिली. त्यानंतर दुसऱ्या चालकाने तत्काळ सावंत यांना उपचारासाठी देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 28/Jul/2025














