संगमेश्वर : बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत माखजन बसस्थानकाला पहिल्या त्रैमासिक सर्वेक्षणात क वर्ग मिळाला आहे. आता दुसऱ्या त्रैमासिक सर्वेक्षणाची तपासणी सुरू झाली असून शुक्रवारी (ता. २५) सिंधुदुर्ग येथील विभागीय समितीने माखजन बसस्थानकाची पाहणी केली.
माखजन येथे आलेल्या सिंधुदुर्ग येथील मूल्यमापन समितीत विभागीय वाहतूक अधीक्षक निलेश लाड, अमित कलकुटकी, लियाकत माखजनकर व श्रीकृष्ण खातू पत्रकार आधी सदस्य सहभागी झालेले होते. मूल्यमापन समितीनेही माखजन बसस्थानकातील स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले. प्रवाशांना स्वच्छ, आरामदायी आणि आरोग्यदायी वातावरण पुरवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने चांगले काम केल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या सार्वजनिक वाहतूक सेवेच्या दर्जात वाढ होत असल्याचे समाधान व्यक्त केले. याप्रसंगी देवरुख आगार प्रमुख मृदुला जाधव, माखजनचे सरपंच महेश पाष्टे, माजी सरपंच उमेश डेरे, लियाकत माखजनकर, वाहतूक नियंत्रक अनिल चव्हाण, सुरेंद्र रहाटे, कार्यालयीन कर्मचारी सत्यवान माईन आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 28/Jul/2025














