संगमेश्वर : देवरुख शहरातील आंबेडकरनगर येथे शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सुमारे दिडशे वर्षे जुना असलेला एक महाकाय शेवर वृक्ष उन्मळून पडला. या घटनेत चंडिका देवी मंदिराची पडझड झाली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राच्या भिंती कोसळल्या आणि छपराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या दुर्घटनेत दोन घरे, बुद्धविहार, नळपाणी योजनेची पाण्याची टाकी तसेच वीज खांबानादेखील मोठा फटका बसला आहे. सुरेश जाधव आणि सुषमा कदम यांच्या घरांचे पत्रे उडाले, मीटर निखळले. मात्र, सुदैवाने कोणालाही शारीरिक दुखापत झालेली नाही. वृक्ष बदलण्यात आला. कोसळल्यानंतर घटनास्थळी तातडीने नगरपंचायतीचे कर्मचारी, महावितरणचे अधिकारी व स्थानिक नागरिक दाखल झाले. कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या बाजूला करण्यात आल्या, तर तुटलेला वीज खांब बदलण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 28/Jul/2025














