मेष – कामाच्या मानाने यशप्राप्ती कमी झाल्याने हताश होण्याची वेळ येईल. सट्ट्या संबंधी थोडे चिंतित राहाल.
वृषभ – आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास व दृढ मनोबलाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल.
वडिलां कडून आपणास काही लाभ होईल.
मिथुन – आजचा दिवस नव्या संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. सरकार कडून लाभ होण्याची शक्यता आहे.
कर्क – आज नकारात्मक दृष्टिकोनातून काही व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य राहील.
सिंह – कोणतेही काम करण्या विषयी त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील व वडीलधार्यां कडून लाभ होईल.
कन्या – आज एखादा वाद होऊन आपला अहंकार दुखावण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा व मानसिक चिंता राहील.
तूळ – विविध क्षेत्रांतून लाभ झाल्याने आपली प्रसन्नता वाढेल. उत्पन्न वाढेल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल व त्यांच्याकडून लाभ सुद्धा होईल.
वृश्चिक – कामाच्या ठिकाणी वातावरण आपणास अनुकूल राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील.
धनु – शारीरिक दृष्टया आळस व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता व व्याकुळता राहील.
मकर – आज अचानकपणे खर्चाचे प्रसंग उदभवतील व त्यामुळे व्यावहारिक किंवा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल.
कुंभ – आज खंबीर मन व दृढ आत्मविश्वासाने आपण प्रत्येक काम कराल. प्रवास – सहलीची शक्यता आहे.
मीन – मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. शारीरिक स्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण आनंदी राहील.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 28-07-2025














