रत्नागिरी : रक्तदाबाचा त्रास असलेल्या वृद्धेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी : शहरातील सह्याद्रीनगर येथील रक्तदाबाचा त्रास असलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. सुलभा रमाकांत धामापूरकर (वय ७२, रा. समर्थ संगम अपार्टमेंट, सह्याद्रीनगर, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.

ही घटना शुक्रवारी (ता. २५) रात्री नऊच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. सुलभा यांना गेली दोन वर्षे रक्तदाबाचा त्रास होता. शुक्रवारी त्या घरातील बेडरुममध्ये झोपलेल्या असताना त्यांची कोणत्याही प्रकारची हालचाल होत नसल्याने त्यांना प्रथम खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 28/Jul/2025