गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी गाणसूरवाडी नदीवरील ब्रिजचा भला मोठा खांब नदीच्या मोठ्या पुराबरोबर वाहून गेला असल्याने या ब्रिजच्या मार्गाने रहदारी करणे अतिशय धोकादायक बनले असून, या मार्गावरून जाणारी एस.टी. वाहतूक बंद करण्यात आली असल्याने येथील प्रवासी, शालेय विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे.
कळझोंडी गाणसूरवाडी येथील ब्रिज वर्षेभरापूर्वी सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आला होता. फक्त एकच पावसाळा गेला, दुसऱ्या पावसाळ्यात जून २०२५ च्या जोरदार पावसामुळे या नदीला पूर आला. त्या पावसाने या ब्रिजचा भला मोठा उजवा कमकुवत असलेला पायाचा पंजा खोदून नेला. या ब्रिजचा पायाखालचा पंजा खोदून नेल्याने हा अर्धा पाय लटकत आहे. हा अर्धा पाय लटकला तर संपूर्ण ब्रिज जमीनदोस्त कधी होईल, याचा पत्ताच लागणार नाही.
या रस्त्यावरून कायम रहदारी असलेल्याने फार मोठी मनुष्य हानी होऊ शकते, अशी संकटजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दीड वर्षांपूर्वी कोणत्या ठेकेदाराने या ब्रिजचे काम केले त्या ठेकेदाराची व बांधकाम मंजुरी देण्यात आलेल्या अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी कळझोंडी ग्रामस्थांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 28/Jul/2025














