रत्नागिरी : बहीण-भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला सण रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमा येत्या ९ ऑगस्ट रोजी सर्वत्र साजरा होणार आहे. त्यानिमित्त रत्नागिरी शहरातील दुकानांत विविध आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली आहेत. आठवडा बाजारात ही एकापेक्षा राख्या विक्रीस दाखल झाल्या आहेत. महिलांना या राख्या भुरळ घालत असल्याचे चित्र असून यंदाही महागाईमुळे राख्यांच्या किमती काहीप्रमाणात वाढल्या असल्याचे सांगण्यात आले.
बाजारपेठेत विविध प्रकारच्या आकर्षक राख्यासह पारंपरिक गोंडा राखी, बाजारात विक्रीस दखल झाली असून महिलांकडून राख्यांच्या दुकानात खरेदीसाठी आतापासूनच गर्दी होत आहे. शहराच्या विविध भागांमध्ये लहान-मोठ्या राखी विक्रीचे दुकाने, स्टॉल सजल्याचे दिसून येत आहे.
परदेश तसेस शहराबाहेर मुंबई, पुणे, बंगलोर, हैदराबाद यासह विविध शहरात कामानिमित्त असलेल्या लाडक्या भाऊरावांना वेळेत राखी पोचण्यासाठी आतापासूनच राखी खरेदी करण्याकडे महिलांचा कल वाढला आहे.
चांगल्यात चांगली आणि आकर्षक राखी खरेदीस महिला, तरुणीकडून पसंती दिली जात आहे. आतापासूनच किरकोळ विक्रेते आणि सामान्य नागरिकांकडून खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. यंदा राख्यांना मागणी वाढली असून महागाईमुळे काहीअंशी राख्या महागले असल्याचे राखी विक्रेत्यांनी सांगितले. आपल्या लाडक्या बहिणींसाठी भेट वस्तू घेण्यासाठी लाडका भाऊ बाजारपेठेत जावून मोबाईल, नवीन ड्रेस, साडी, विविध प्रकारचे भेट वस्तू घेण्यासाठी बाजारपेठकडे वळू लागला आहे.
याठिकाणी विक्री सुरू
मारुती मंदिर, माळ नाका, साळवी स्टॉप, जे. के. फाईल, कोकणनगर, आरोग्य मंदिर, बसस्थानक, रेल्वे स्थानक परिसर यासह शहरातील विविध ठिकाणी, तालुक्यातील लांजा, दापोली, चिपळूण, गुहागर, राजापूर, मंडगणगड, संगमेश्वर, विक्री सुरू झाली आहे. खेड येथील प्रत्येक बाजारपेठ, दुकानात विक्री सुरु झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:47 PM 28/Jul/2025














