नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत नागाच्या मूर्ती विक्रीसाठी दाखल

रत्नागिरी : नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात रविवारीपासूनच नागोबाच्या मूर्त्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.

श्रावण महिन्यात व्रतवैकल्ये आणि सणांची रेलचेल दिसून येते. नागपंचमीचा पहिलाच सण मंगळवारी (दि.29 जुलै) घरोघरी साजरा होणार आहे. गेले काही दिवस गणपतीच्या मूर्ती शाळांमध्ये तसेच काही हौशी मूर्ती कलाकार नागोबाच्या मूर्ती घडविण्यात व्यस्त होते. बाजारपेठेमध्ये ठिकठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या लहान लहान नागाच्या मूर्त्या दृष्टीस पडत आहेत. आकर्षक रंगसंगतीने बनविण्यात आलेल्या मूर्ती नागरिक खरेदी करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:04 28-07-2025